महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई पत्रकार संघाच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई पत्रकार संघाच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांसह नागरिकांना दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
दीपावली हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण असून, प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट घेऊन येणारा हा सण आहे. समाजातील अंधकार दूर होऊन सर्वत्र ज्ञानाचा, विकासाचा आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरावा, अशी सदिच्छा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हा समन्वयक श्री. जनार्दन जगताप (सर), कोपरगाव तालुकाध्यक्ष प्रा. विजय कापसे (सर) तसेच कोपरगाव शहराध्यक्ष हाफिज शेख यांनी दीपावलीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
“दीपावलीचा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि यशाची नवी पहाट घेऊन येवो,” अशा शुभेच्छा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आल्या.



