श्री वरद विनायक गणपती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

श्री वरद विनायक गणपती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन
कोपरगाव : दत्तनगर मित्र मंडळाच्या वतीने श्री वरद विनायक गणपती मंदिराचा वर्धापनदिन तसेच अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने कीर्तनसेवा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्तनगर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमात कु. ज्ञानेश्वरी दिदी पडवळ तसेच ह.भ.प. कार्तिक प्रमोद शिंदे यांची कीर्तनसेवा होणार आहे. सदर कीर्तनसेवा श्री ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था, आळंदी यांच्या माध्यमातून होणार आहे.
या कार्यक्रमास सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून श्री. स्वप्निल दिलीप मंजुळ, नगरसेवक, कोपरगाव नगर परिषद यांचीही उपस्थिती राहणार आहे.
स्थळ : दत्तनगर मित्र मंडळ, दत्तनगर, कोपरगाव.
अंगारक संकष्टी चतुर्थी आणि मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहून कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



