0
1
1
9
0
6
भारतीय जनता पक्षावर निराधार आरोप व टीका करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कोपरगावच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे. एकीकडे राज्यातील महायुती सरकारमध्ये आमदार काळे यांनी सत्तेचा उपभोग घ्यायचा. त्यांच्या पक्षश्रेष्ठींना देखील फसवायचे आणि दुसरीकडे त्यांच्या चेले चपाट्यांनी भारतीय जनता पक्षावर पातळी सोडून टीका करायची, हा दुटप्पीपणा जनतेच्या लक्षात आला आहे अशी परखड भूमिका भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी व्यक्त केली आहे.
आमदार आशुतोष काळे यांचे नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी भारतीय जनता पक्षाबाबत केलेली वक्तव्ये अत्यंत खेदजनक व आक्षेपार्ह आहेत. भारतीय जनता पार्टीसोबत मांडिला मांडी लावण्याचे एवढे वितुष्ट वाटत असेल तर तसे आमदार काळे यांना सांगा आणि भूमिका जाहीर करा.
0
1
1
9
0
6



