प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे हस्ते गोदाकाठ २०२५ चे हजारो महिलांच्या उपस्थितीत उद्घाटन
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे हस्ते गोदाकाठ २०२५ चे हजारो महिलांच्या उपस्थितीत उद्घाटन
कोपरगांव — प्रियदर्शनी महिला इंदिरा महिला मंडळ आयोजित महोत्सव वतीने महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबलगो ट्रस्ट कोपरगाव येथे आयोजित ‘गोदाकाठ महोत्सव 2025’चे उदघाटन मंडळाच्या अध्यक्षा मा.सौ. पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते व आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माझी संचालिका मा.सौ. चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कोपरगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद – पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, आशा सेविका, लाडकी बहीण योजनेसाठी मदत करण्याऱ्या स्वयंसेविका यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी तहसीलदार महेशजी सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिताताई सातपुते, कृषी अधिकारी मनोजजी सोनवणे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजयजी आगवन, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथजी जामदार, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन देवेनजी रोहमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धनजी परजणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे व्हा. चेअरमन, संचालक, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक आदी उपस्थित होते.





