Breaking
ब्रेकिंग

कोपरगाव शहर पोलिसांचा बेशिस्त वाहनधारकांना दणका; 68 वाहनचालकांवर कारवाई

0 1 1 9 0 6

कोपरगाव शहर पोलिसांचा बेशिस्त वाहनधारकांना दणका; 68 वाहनचालकांवर कारवाई

कोपरगाव : शहरातील वाहतूक शिस्त अबाधित राहावी आणि बेशिस्त वाहनधारकांना आळा बसावा, यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी 11 ऑगस्ट रोजी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल 68 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, ई-चलनद्वारे 64 वाहनचालकांकडून 35 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईमध्ये विना परवाना वाहन चालविणे, विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, कर्कश हॉर्न, फटाका सायलेन्सर तसेच नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.

याशिवाय बीएनएस कलम 125 अंतर्गत एक, बीएनएस कलम 285 अंतर्गत एक तसेच ड्रिंक अँड ड्राईव्हच्या दोन प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 68 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली.

या धडक कारवाईमुळे शहरातील दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनधारकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ही कारवाई कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वाहतूक हवालदार दिगंबर शेलार व निंभोरे यांनी विशेष परिश्रम घेत कारवाई यशस्वी केली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 9 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे