कोपरगावात होमगार्ड दिन उत्साहात संपन्न

कोपरगावात होमगार्ड दिन उत्साहात संपन्न
होमगार्ड वर्धापन दिन दर वर्षी डिसेंबर महिन्यात साजरा केला जातो हा दिवस देशभरात होमगार्ड आणि नागरी संरक्षण स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो या दिनानिमित्त अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये 7 ते 13 डिसेंबर या कालावधीत होमगार्ड दिन वर्धापन दिन सप्ताह म्हणून वेद कार्यक्रमाचे आयोजन केले जाते कोपरगाव येथे नुकताच दिन मान्यवरांच्या उपस्थितीत असा संपन्न झाला आहे .
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावणारे होमगार्ड स्वयंसेवक या दिनाचे केंद्रबिंदू असतात. पोलिस दलाचे एक पूरक दल म्हणून कार्य करणारे होमगार्ड, नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींमध्ये, प्रवेशी आणि निर्गम मार्गांचे नियंत्रण, नागरिकांचे रक्षण आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी कायमस्वरूपी सज्ज असतात. समाजासाठी निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्या या वीर स्वयंसेवकांच्या कार्याची ही आठवण करून देणारी ही महत्त्वाची तारीख आहे.
होमगार्ड दलाची स्थापना सर्वप्रथम डिसेंबर १९४६ मध्ये मुंबई प्रांतात तत्कालीन नागरिक अशांतता आणि जातीय दंगली आळा घालण्यासाठी पोलिसांना मदत करण्याच्या उद्देशाने स्वयंसेवी दल म्हणून कार्यान्वित करण्यात आली होती त्यानिमित्त हा स्थापना दिन साजरा होतो कोपरगाव येथे दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे

या सप्ताह दरम्यान स्वच्छता अभियान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण प्रथमोपचार आणि बचाव कार्याची प्रात्यक्षिके वाहतूक नियमाचे पालन सामाजिक एकता यासारख्या विषयांवर पथनाट्य परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले हे सदर कार्यक्रमासाठी समादेशक अधिकारी अतुल पाटील, पोलिस हवालदार लिंबोरे ,पोलीस कॉन्स्टेबल बाळू धोंगडे, होमगार्ड रवी खुडे, महेश आरंगडे ,शरद शिंगाडे शेख सुभान, संजय मोकळ, रवींद्र घोरपडे, अमित खोकले आधीच बहुसंख्य होमगार्ड उपस्थित होते




