लायन्स बिझनेस एक्स्पोतील रिल स्पर्धेत दिव्यांका परदेशी प्रथम

लायन्स बिझनेस एक्स्पोतील रिल स्पर्धेत दिव्यांका परदेशी प्रथम
कोपरगाव : कोपरगावकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या बहुचर्चित लायन्स बिझनेस एक्स्पो 2026 मध्ये आयोजित रिल कॉम्पिटिशन स्पर्धेत दिव्यांका परदेशी हिने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिचा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कोपरगावकर ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात, त्या लायन्स बिझनेस एक्स्पो, क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव २०२६ ची दणक्यात सुरुवात दि. १२ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. पाच दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये एकूण २११ विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. “या वर्षी उत्सव कोपरगावकरांचा… भारतीय संस्कृतीचा” या संकल्पनेवर आधारित ‘भारताची ७ आश्चर्ये’ हा विशेष देखावाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

या महोत्सवात ‘डान्स कोपरगाव डान्स’ स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा तसेच रिल बनविण्याची स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ १६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

रिल कॉम्पिटिशनमध्ये दिव्यांका परदेशी हिने आपल्या सर्जनशीलता, कल्पकता व सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवित अल्पावधीतच सोशल मीडियाच्या माध्यमातून आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या या यशाबद्दल शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब नगराध्यक्ष पराग संधान साई देवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वाजे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.
दिव्यांकाच्या या यशामुळे कोपरगावच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




