Breaking
ब्रेकिंग

जगतगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज दिंडी सोहळ्यात कोपरगावच्या शिवराज वहाडणे परिवाराची सेवाभावी सहभागिता.

0 1 1 9 0 6

जगतगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज दिंडी सोहळ्यात कोपरगावच्या शिवराज वहाडणे परिवाराची सेवाभावी सहभागिता.

१० हजार वारकरी बंधू-भगिनींना आर्थिक मदतीच्या स्वरूपात सेवा अर्पण केली यंदाचे हे ४ थे वर्ष होते

“ज्ञानोबा माऊली तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” च्या अखंड नामघोषात पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिस्तबद्ध दिंडी सोहळ्यात यावर्षीही कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडने यांच्या प्रेरणेने शिवराज वहाडणे व वहाडणे परिवाराने सेवाभावी सहभाग नोंदविला.

या दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणे हे आमच्या वहाडणे परिवाराचे मोठे सौभाग्य असल्याची भावना शिवराज वहाडणे यांनी व्यक्त केली. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांना या पवित्र सेवेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी लाभली.

संत तुकाराम महाराजांचे थेट वंशज परमपूज्य श्री पुंडलिक महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणाऱ्या या दिंडी सोहळ्यात श्री.करणजी भुजबळ यांच्या सहकार्याने तसेच ज्येष्ठ बंधू अभिजित विजय वहाडणे यांच्या संकल्पनेतून सुमारे १० हजार वारकरी बंधू-भगिनींना आर्थिक मदतीच्या स्वरूपात सेवा अर्पण करण्यात आली.यंदाचे हे ४ थे वर्ष होते

या सेवाकार्यात त्यांच्यासह हर्षल गवारे, आसिफ शेख, शिवराज वहाडणे व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. जगातील सर्वात मोठ्या दिंडी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य असल्याचे शिवराज वहाडणे यांनी सांगितले.

दरम्यान, पिराची करोली येथे पालखीचा मुक्काम असताना शेजआरती आणि पादुका पूजनाचा मानही वहाडणे परिवाराला मिळाला. हा आध्यात्मिक सन्मान आयुष्यभर स्मरणात राहील, अशी भावना परिवारातील सदस्यांनी व्यक्त केली.

या उपक्रमासाठी संभाजीनगर येथील एक दानशूर व्यक्ती व मित्र परिवाराचे भरीव आर्थिक सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 9 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे