Breaking
ब्रेकिंग

सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा.

0 0 7 1 4 6

सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा.

श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे कोपरगाव तालुक्यातील महादेव देवस्थानात होळी उत्साहात साजरा करण्यात आला आहे.श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थान ,जुने गावठाण, सराफ बाजार, कोपरगाव येथील सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला आहे.

प्रारंभी सोमेश्वर महादेव, गणपती, गंगामाता,नंदी पुजन करण्यात आले.सोमेश्वर महादेव देवस्थान समोरील प्रांगणात सडा,रांगोळी करुन उस,गोवरीने,फुलांची सजावट करुन पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक होळी सजविण्यात आली. मंत्रोच्चार आणि विधवत पुजन करत सनई चौघड्यांचे निनादात होळीचे दहन करण्यात आले.

श्रीमंत पवार सरकार संस्थानचे श्रीमंत महादेव देवस्थान बेट-कोपरगाव, गंगेश्वर महादेव देवस्थान, जेऊर कुंभारी येथेही होळी उत्सव साजरा करण्यात आला.

या प्रसंगी सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख सौ. व श्री.महेंद्रजी(बाळासाहेब) पाटील, होळी उत्सवाचे यजमान सौ. व श्री.रमेशस्वामी जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुशांतजी घोडके, पौरोहित्य श्री. प्रदिपशास्री पदे, श्री. नंदूजी शेंडे(गुरव), सोमेश्वर महादेव भक्त मंडळाचे सदस्य, श्रीमंत महादेव देवस्थान बेटचे व्यवस्थापक समिती, पुजारी श्री.विजयजी वाघमारे(गुरव), गंगेश्र्वर महादेव देवस्थानचे श्री. आप्पासाहेब वक्ते, श्री. पाटीलबा वक्ते, यांचे सह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे