Breaking
ब्रेकिंग

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले

0 1 1 9 0 6

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील रहिवासी हभप भीमराज महाराज जाधव यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ते (८६) वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायासह सामाजिक व धार्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

भीमराज महाराज यांनी अनेक वर्षे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले.

नगर जिल्ह्यातील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. काही काळ त्यांनी वारकरी संप्रदायाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळली होती.

लक्ष्मीनगर येथील विजयी हनुमान प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

गायनाचार्य म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या कीर्तन व भजन सेवेमुळे त्यांनी अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले होते.

त्यांच्या पश्चात मुकुंद जाधव, साई संगीतमय कथाकार संतोष जाधव, ही दोन मुले, अनिता सोमनाथ वाघ, छाया सुदाम कोरडे या,दोन मुली सुना, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 9 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे