महिलांच्या कायदेविषयक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार” – ॲड सविता कदम (पोळ)
महिलांच्या कायदेविषयक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार” – ॲड सविता कदम (पोळ)
कोपरगाव
सामाजिक न्यायाची भाषा करत असताना सध्याच्या काळात समाजातील महीलांना अनेक कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागत आहे . त्यामुळे आगामी काळात महिलांच्या कायदेविषयक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कोपरगाव वकील संघाच्या नवनिर्वाचित महिला उपाध्यक्ष ॲड सविता कदम (पोळ ) यांनी व्यक्त केले
कोपरगाव वकील संघाची वार्षिक निवडणुक नुकतीच संपन्न झाली असून अध्यक्ष पदावर ॲड शरद गुजर तर उपाध्यक्ष पदी ॲड महेश भिडे व महिला उपाध्यक्ष पदी ॲड सविता कदम (पोळ) यांची तसेच सचिव पदावर ॲड परेश डागा, सह सचिव पदावर ॲड महेंद्र जाधव तर खजिनदार पदी नितिन गिरमे यांची बिन विरोध निवड करण्यात आली
कोपरगाव वकील संघाची सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. सुरुवातीच्या काळात महिला वकीली व्यवसायात कमी प्रमाणात येत होत्या. मात्र वकीली पदवीचे शिक्षण उपलब्ध झाल्याने ही संधी मिळाली असून कोपरगाव सारख्या नामांकित वकील संघाच्या महिला उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली हे खूप मोठे भाग्य आहे.
या पदावर काम करत असताना समाजातील विद्यार्थिनी, नोकरदार महिला, मजुरी करणाऱ्या महिला यांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो.मात्र वेळेवर योग्य कायदेशीर मार्गदर्शन न मिळाल्याने अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करुन देण्यासाठी प्रयत्न शिल राहणार असल्याचे ॲड सविता कदम (पोळ) यांनी सांगितले




