आमदार आशुतोष काळ शुभ हस्ते गौतम सहकारी बँकेच्या विविध ग्राहक हित जोपासणारे उपक्रम शुभारंभ
आमदार आशुतोष काळ शुभ हस्ते गौतम सहकारी बँकेच्या विविध ग्राहक हित जोपासणारे उपक्रम शुभारंभ
कोपरगाव — ग्राहकांच्या सोयीसाठी सुरु केलेल्या डेबिट कार्ड, युपीआय, क्यु आर व मोबाईल बँकिंग सुविधेचे आज आमदार आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजयजी आगवन, माजी चेअरमन बाबासाहेबजी कोते, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, सतीशशेठ कृष्णाणी, दत्तोबाजी गवारे, डॉ. चंद्रशेखरजी आव्हाड, अॅड. शंतनूजी धोर्डे, डॉ. शेखरजी फडके, गौतम सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमूड, सर्व संचालक, कोपरगाव शहर व तालुक्यातील व्यापारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.





