कोपरगाव नगर परिषदेचे . एम के आढाव विद्यालय माजी विद्यार्थी – दहावी बॅच सन १९८४-८५ . गेट टू गेदर संपन्न
कोपरगाव नगर परिषदेचे
. एम के आढाव विद्यालय
माजी विद्यार्थी – दहावी बॅच सन १९८४-८५
. गेट टू गेदर संपन्न
कोपरगाव नगर पालिका विद्यालयाचे माजी विद्यार्थी तब्बल ४० वर्षांनी एकत्र आले या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शिर्डी समृद्धी मार्गजवळील हॉटेल स्वस्तिक येथील सांस्कृतिक हॉल मध्ये झाला

यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला, काहींनी आनंदाश्रुना वाट मोकळी करून दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शकील कुरेशी हे होते तर सूत्रसंचालन महेंद्र टोरपे यांनी केले.

आपले वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून ५७ ते ६० वयाकडे झुकलेले सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले सर्वांच्या चेहऱ्यावर अनेक वर्षा नंतर भेटल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
चाळीस वर्षा नंतर एकत्र आले आणि सर्वांची गळाभेट झाली.
राजेंद्र अडांगळे, गोरख पंडोरे, मंगला भागवत, संजीवनी सोनार, रेणुका जोशी, चंद्रकांत पाले, यांनी आपले मनोगत व्यक्त केले, अध्यक्षीय मनोगत शकील कुरेशी यांनी व्यक्त केले.

सदर प्रसंगी अरुण शिरसाठ, मनोज दरपेल,प्रकाश शर्मा, चंद्रकला आवारे, अंबादास जाधव, दिलीप जोर्वेकर, किरण मवाळ, राजेंद्र सोनवने, प्रदीप इर्षे, यांचे सह 84.85 दहावी बॅच चे मित्र उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी प्रास्ताविक नारायण तांबट यांनी केले तर काव्यगीत विजय चव्हाण यांनी सादर केले . स्वागत मनोज लोट, बाळासाहेब चव्हाण यांनी सर्वांना गुलाबपुष्प देऊन केले.


कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महेंद्र टोरपे यांनी उपस्थितांचे आभार मानले.





