कोपरगाव तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
कोपरगाव तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
स्टील चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले

शिर्डी कडून मुंबई कडे जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर स्टील चोरी करून विकणाऱ्या तिघांना कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली असून सुमारे चार लाख 65 हजार रुपयांचा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला

या गुन्ह्यात सागर हनुमंत आहेर वय 24 ,अशोक बळीराम आहेर 29, दोघे राहणार आहेर वस्ती भोजडे विजय संजय मुळेकर राहणार दहेगाव बोलका तालुका कोपरगाव या तिघांना कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

स्टील चोरी करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना विशेष सूचना देवून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे पोलिसांनी कडक कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले – पोलीस निरीक्षक संदीप कोळी

सदर आरोपींकडून 65000 चे स्टील एक mh 04 68 50 क्रमांकाची महिंद्रा पिकप असा एकूण चार लाख 65000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

समृध्दी महामार्गावरील स्टील चोरी करणारे सराईत गुन्हेगारांना कोपरगाव तालुका पोलिसांनी धडक कारवाई करून अटक केल्याने पोलीस निरीक्षक संदीप कोळी ,कोपरगाव तालुका पोलिसांवर नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे




