Breaking
ब्रेकिंग

रयत स्पर्धा परीक्षा अॅकॅडमीचे मान्यवरांच्या हस्ते आज उद्घाटन

0 0 7 1 4 6

 

रयत स्पर्धा परीक्षा अॅकॅडमीचे मान्यवरांच्या हस्ते आज उद्घाटन

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्‌गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे नवे दालन खुले होणार असून रयत स्पर्धा परीक्षा अॅकॅडमीचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.


या अॅकॅडमीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. अॅड. भगीरथकाका शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी पोलीस उपअधीक्षक मा. श्रीमती उषाताई पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. सौ. चैतालीताई काळे, मा. श्री.विवेकभैय्या कोल्हे, मा. अॅड. संदिपभाऊ वर्पे, मा.श्री. सुनील गंगुले, मा.श्री. महेंद्रकुमार काले, मा.श्री. बाळासाहेब आव्हाड तसेच मा. डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माधव सरोदे, व रयत स्पर्धा परीक्षा अॅकॅडमीचे चेअरमन डॉ. सीमा चव्हाण-दाभाडे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे