रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी,नागरिकांत संतापाची लाट
कोपरगाव नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी ….प्रशासनाचे दुर्लक्ष
28 ऑक्टोंबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास येवला नाका बजाज शो रूम समोर घडलेल्या या अपघात आदित्य कैलास देवकर रा. इंदिरापथ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.सदरचा तरुण खड्ड्यांमुळे रस्त्याच्या बाजूला पडला असता अंगावरून अज्ञात वाहन गेल्याचे समजते.भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे कळते.नागरिकांनी घटना स्थळी मोठी गर्दी केली होती…नागरिकांमध्ये सदर घटनेमुळे मोठ्या प्रमाणात संताप आहे.
आदित्य चां मोठ्याप्रमाणात चाहता वर्ग असून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने कोपरगावात मोठ्याप्रमाणात शोककळा पसरली आहे
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांतून मार्ग काढताना कोपरगावकरांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना सोसाव्या लागणाऱ्या नागरिकांच्या यातनांकडे नगरपालिका अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांवरील नियंत्रण सुटले आहे. परिणामी शहरातील नागरिकांना रस्त्यातून खड्डे वाचविताना जीव धोक्यात घालावा लागत आहे.

खड्ड्यांमुळे आदित्य देवकर 29 वर्षीय तरुणाचा बळी गेल्याने नागरिकांत तीव्र संतापाची लाट आहे




