खड्ड्यांमुळे कोपरगावकरांचा जीव धोक्यात
खड्ड्यांमुळे कोपरगावकरांचा जीव धोक्यात
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांतून मार्ग काढताना कोपरगावकरांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना सोसाव्या लागणाऱ्या नागरिकांच्या यातनांकडे नगरपालिका अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांवरील नियंत्रण सुटले आहे. परिणामी शहरातील नागरिकांना रस्त्यातून खड्डे वाचविताना जीव धोक्यात घालावा लागत आहे.
खड्ड्यामुळे येवला नाका परिसरात अपघात होऊन आदित्य कैलास देवकर या तरुणाचा बळी गेला आहे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे
रस्त्याचीही कामे अद्याप पूर्ण झाली नाही.
. रस्त्यांवर मोठे खड्डे असून नागरिकांना वाहने काढताना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा दुचाकीधारकाकडून खड्ड्याला बगल देण्यासाठी दुचाकी वळवावी लागते. परिणामी या रस्त्यावर अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे. बसस्थानक चौकापर्यंत वर्दळीचा मार्ग असून येथेही खड्ड्यांनी नागरिक बेजार झाले आहेत. या रस्त्यावरून दुचाकीधारक नव्हे तर चारचाकी, जड वाहनधारकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याचे पुनर्भरण योग्यरित्या न झाल्याने या खड्ड्यापासून वाहन चालविताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन पुढे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत मुख्याधिकारी यांनी रस्त्यांच्या स्थितीबाबत आढावा घेतला नाही. अधिकाऱ्यांची कानउघडणीच होत नसल्याने अधिकारी चांगल्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधाही पुरविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. यातूनच अधिकाऱ्यांच्या उदासीन मानसिकतेचीही दर्शन होत आहे.रस्त्यांच्या स्थिती बाबत आमदार ,अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे




