धक्कादायक… बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

धक्कादायक… बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू
बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेचा मृत्यू संतप्त जमावाने केला नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको.कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेचां दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली आहे संतप्त ग्रामस्थांनी टाकळी फाट्यावर रास्ता रोको करीत प्रशासन विरुद्ध रोष व्यक्त केला आहे.

दहेगाव नांदगाव येथील चव्हाण कुटुंब ऊसतोडीसाठी टाकळी शिवारात आले होते. रात्रीच्या सुमारास त्यांच्या चार वर्षांच्या मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत नगर–मनमाड महामार्गावर रस्तारोको आंदोलन केले. प्रशासन व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाऱ्यावर धरत ग्रामस्थांनी कठोर कारवाईची मागणी केली.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रास्तारोको केला, तरी वनविभाग व प्रशासनाला जाग येत नाही. अजून किती बळी गेल्यानंतर उपाययोजना होतील? ” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली
कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा येथे चार वर्षीय मुलीचा बिबट्याने घेतला बळी..! नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिकांचा रस्तारोको..

यावेळी टाकळी फाट्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. सदर मयत झालेल्या मुलीचे नाव नंदिनी प्रेमनाथ चव्हाण रा.तळेगाव नांदगाव असे असून ऊसतोडणी करण्यासाठी आले आहे.कोपरगाव शहरात बिबट्याची दहशत मोठ्याप्रमाणात वाढत चालली आहे .आठवडाभरात बिबट्याने लहान मुलांसह नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू अत्यंत दुःखद घटना असून कोपरगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे
सदर परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असून वनविभागाने त्वरीत बिबट्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.





