Breaking
ब्रेकिंग

सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहिर…

0 0 7 1 4 6

🌞
सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहिर…

कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा २०२५ या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करत असल्याची माहिती परिक्षण समिती प्रमुख सौ. कल्पना हेमंत गिते यांनी दिली आहे.

सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अ.भा.मराठी नाट्य परिषद ,बाल रंगभूमी परिषद,अहिल्यानगर,कलाध्यापक संघ यांचे सहभागातून आणि विसपुते सराफ, धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म, एच.एम.राजपाल, सुमंगल प्लायवुड, कापसे पैठणी, पुष्पांजली शाॅपी, अग्रवाल चहा, पांडे स्विटस्, सुशांत आर्टस् ॲन्ड पब्लिसिटी यांचे सहकार्याने सालाबादप्रमाणे परंपरेनुसार १३ व्या वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कुठलेही प्रवेश शुल्क न आकारता सहभागी स्पर्धकांच्या घरासमोरील अंगणात बुधवार दि.२२ ऑक्टोबर २०२५ रोजी परंपरेनुसार याही वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी पारंपारिक, निसर्गचित्र,व्यक्तीचित्र, सामाजिक
विषय, भौमितिक आकार, व्यंगचित्र, पुष्प सजावट असे सात विषय ठेवण्यात आले होते. स्पर्धकांनी या स्पर्धेत उस्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

पारंपरिक रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) अंजली भडकवाडे, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) पुष्पा खोसे, संगिता पन्हाळे, वैष्णवी आहेर, अंकिता मोरे, दिव्या बाविस्कर, सुनिता बिडवे, आरती बाविस्कर, दर्शना जोशी, वृषाली टुपके, साक्षी निकुंभ, चंदा डुचे, दिपाली जाधव, निकिता पन्हाळे, विद्या खर्डेकर, गायत्री थोरात, मोहिनी पन्हाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

निसर्ग चित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक(पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) संगिता देवकर, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) श्रावणी साखरे, शौभवी आहेर, विभावरी जोशी, प्रतिक्षा पाडेकर, शुभांगी काले यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

व्यक्तिचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) अक्षरा पन्हाळे, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) शुभांगी महाजन, रुपाली मोरे, अक्षदा पवार, दिपाली निळे, वेदिका ढगळे, मंगल चिखले, सोनल गुंडे, साक्षी भगत, जुई खामकर, प्रेरणा परिख, अंजली गोंजारे, सारिका कुहिरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सामाजिक विषय रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) वैशाली रक्ताटे, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) आदिती गगे, प्रांजल रोकडे, गायत्री लोढा, खुशी हंसवाल, सुरेखा लांडगे, वैष्णवी बोरुडे, स्तुती गायकवाड यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

भौमितिक आकार रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) आदित्य घोरपडे, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) सेजल वरखेडे, मानसी माळवदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

व्यंगचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) आदिती नाईक, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) अंजली गवारे, वैष्णवी गवारे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

पुष्प सजावट प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) पुजा मुंदडा, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) धनश्री वरखेडे, सुचेता घुमरे, विद्या वाणी, रेणु भोकरे, मुक्ता बागुल यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

बक्षिस विजेत्यांचे सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके, प्रा.सौ.लताताई भामरे, डॉ.नीलिमाताई आव्हाड, ॲड.सौ.स्मिमाताई जोशी, प्रा.मसुदा दारुवाला, प्रा. सौ.वासंतीताई गोंजारे,प्रा.प्राजक्ता (देशमुख) राजेभोसले,सौ.भाग्यश्रीताई जोशी, प्रा.ऋतुजा कोळपकर, सौ. वर्षाताई जाधव, प्रा. माया रक्ताटे, प्रा.ऐश्वर्या वाघमारे,सौ.गौरी वायखिंडे (मळिक),परिक्षण सहाय्य समितीचे प्रा.अनिल अमृतकर, प्रा.मतीन दारुवाला,प्रा.अतुल कोताडे, जयंत विसपुते,अमोल शिंपी, प्रा.वंदना अलई,ॲड.महेश भिडे, रविंद्र भगत, महेश थोरात, सुमित शिंदे, आनंद टिळेकर, अनंत गोडसे, मंगेश भिडे, कल्पेश टोरपे, अमोल पवार यासह सूर्यतेज संस्थेचे सदस्य कलाध्यापक संघटना,नाट्य परिषद ,कलाप्रेमी नागरिकांचे सूर्यतेज सल्लागार समिती व सर्व सदस्यांनी यांनी अभिनंदन केले आहे.

रांगोळी स्पर्धेच्या सहा प्रकारात प्रथम क्रमांक विजेते परिक्षण समितीच्या शिफारसीनुसार पुढील वर्षापासून संयोजन समिती व परिक्षण सहाय्यक सदस्य म्हणून कामकाज पहातील.आणि प्रदर्शनार्थ रांगोळी साकारतील. प्रदर्शनार्थ कलाकृतींचा सन्मान होणार आहे.सर्व बक्षिस विजेत्यांच्या सन्मानाची दिनांक,ठिकाण आणि वेळ हे आयोजकांकडून
विजेत्यांना पत्र/मोबाईल द्वारे कळविण्यात येईल.असे सूर्यतेजचे स्पर्धा समिती यांनी कळविले आहे.बक्षीस विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…
#दीपावली_पाडवा_उत्सव…
#घर_तेथे_रांगोळी_स्पर्धा_२०२५…
#सूर्यतेज…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे