Breaking
ब्रेकिंग
Trending

नरभक्षक बिबट्याला केले ठार

0 0 7 1 4 6

वनविभागाला अखेर १०दिवसानंतर यश, नरभक्षक बिबट्याला केले ठार

जिल्ह्यातील कोपरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आणि एका मुलीसह वृद्धेचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी मध्यरात्री १२:३० ते १ वाजेच्या सुमारास कोपरगावनजीक टाकळी शिवारात गोळ्या घालून ठार मारले असल्याची माहिती सहाय्यक उपवनसंरक्षक गणेश मिसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांनी दिली आहे

 नाशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल,यांनी बिबट्याला ठार मारण्यासाठी चोख बंदोबस्त करून ठेवला होता परंतु बिबट्या दहा दिवसांपासून हुलकावणी देत होता बिबट्याने नंदिनी प्रेमदास चव्हाण या तीनवर्षीय चिमुरडीचा बुधवारी (दि.५) बिबट्याने बळी घेतला.

या घटनेला आठवडाही उलटला नाही, तोच सोमवारी (दि.१०) बिबट्याने शांताबाई अहिलू निकोले (६०) या महिलेला ठार केले होते.कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात निकोले वस्ती याठिकाणी सोमवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास शांताबाई अहिलू निकोले या घरासमोरील शेतात जनावरांसाठी गवत कापत होत्या.

त्याचवेळी कापसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने शांताबाईंवर हल्ला करून त्यांना पिकात ओढत नेले. शांताबाईचा आवाज ऐकून निकोले वस्तीवरील इतर नागरिक धावले. तेव्हा बिबट्याने त्यांना सोडून पळ काढला; परंतु शांताबाईंचा जागेवरच मृत्यू झालाहोता. कोपरगाव,राहुरी आणि संगमनेर वन विभागाचे पथक बिबट्याला शोधत होते. अखेर या बिबट्याला पुण्याच्या दोन शूटरकडून ठार मारल्याने नागरिकांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला असून हे परिश्रम घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी,वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांनी अहोरात्र पहारा ठेवून रेस्यु ऑपरेशन यशस्वी केल्याबद्दल परिसरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे