प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडीयम स्कूल जेऊर पाटोदा विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उदघाटन व ध्वजारोहण समाजसेवक भाजप युवा शहर अध्यक्ष श्री अर्जुन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सौ चैताली अनुजकुमार कुमणे यांनी उत्स्फूर्त पणें भाषण केले. कार्यक्रमास ओमसाई प्रतिष्ठान कोपरगाव संस्थेच्या च्या अध्यक्षा व मुख्याध्यापिका सौ. हुताशती कुदळे,उपाध्यक्ष श्री राजेंद्र कुदळे,सचिव श्री लक्ष्मण कुदळे,पालक श्री आनंद कोपरे,श्री आनंद भाऊगडे,श्री सुयोग दहिफोडे,सौ मीनाक्षी रणवरे,सौ सोनाली दवंगे ,श्री मेहेरे,सौ म्हस्के ,सौ वाघ,उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप चिमुकल्यांच्या नृत्य कार्यक्रमाने झाला.उपस्थितांचे आभार सचिव श्री लक्ष्मण कुदळे यांनी मानले







