Breaking
ब्रेकिंग

आ. काळेंची लाडकी दादागिरी मी सहन करतो, ती कोपरगावकरांच्या हिताची – मा.उपमुख्यमंत्री अजित पवार

0 0 7 1 4 6

आ. काळेंची लाडकी दादागिरी मी सहन करतो, ती कोपरगावकरांच्या हिताची – मा.उपमुख्यमंत्री अजित पवार

आज तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीने शब्द देतो विकास कामाच्या करता जे काही पाठबळ लागेल जे काही सहकार्य लागेल ते देण्याच्या करता हा अजित पवार तुमच्यासमोर कुठे कमी पडणार नाही .
विकास कामाला मदत करणं हे तर माझा हक्क आहे तो तर मी देणार तो तर मी करणार आणि त्याच्याकरता कार्यकर्ता या नात्याने आमचा आशुतोष काळे हा सतत प्रयत्नशील असतो .

महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या वाढली माझा पुणे जिल्हा माझा नाशिक जिल्हा माझा अहिल्यानगर जिल्हा आणि त्याचा एक प्रसंग सांगतो कोपरगाव तालुक्यातील काही नागरिकांच्या वर हल्ले झाले दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आशुतोषनी फोन केला त्या घटना घडल्या होत्या रस्ता बंद केला होता तिथे तो गेला आणि तिथून त्याने मला फोन केला तेव्हा मी माझ्या पीए सांगितलं की आता नाही माझी मीटिंग झाल्यानंतर मी फोनवर येईल त्यावेळेस माझ्या पीए ने आशुतोष दादा ला सांगितले .तेव्हा पीए ला आशुतोष दादा ने सांगितलं दादा मीटिंगमध्ये असले तरी देखील मला दादांची ताबडतोब बोलायचं मी ऐकणार नाही मला वाटलं काहीतरी दिसते फोन मी घेतला आणि त्यावेळी माझ्या पीए ने चालू मिटिंग मधनं मला तो फोन आणून दिला आणि सर्वांवर सर्वांना त्यांनी स्पीकरवर घेतलं त्याच्यानंतर त्यांनी जे काही सांगितले ते मला बोलून दाखवलं मित्रांनो क्षणाचाही विचार न करता फोन ठेवला ठेवलं मी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला आणि सांगितलं ताबडतोब तिथे असा प्रकार घडलेला आहे कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झालेला निष्पाप त्या मुलाचं आजच्या व्यक्तीचे तिथं निधन झालेलं आहे आणि त्यामध्ये या पद्धतीने तुमचा आशुतोष हा कधीकधी अशी का लाडकी दादागिरी करतो आम्ही लाडक्या बहिणींना मदत केली पण ही लाडकी दादागिरी माझ्यावर चालवतो महाराष्ट्र मला घाबरतो मी सांगितलं नाही आता भेटणार नाही त्याची मी सहन करतो त्याचा कारण की लाडकी असलेली दादागिरी तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी त्याने त्या ठिकाणी केलेली होती आणि त्याची ही लाडकी दादागिरी मी आनंदानी सहन केली आणि खूप पुढे पण सहन करत राहील त्याबद्दल तिळ मात्र शंका मनामध्ये तुम्ही बाळगू नका आपल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने पण जे काही शब्द मी दिलेले होते ते शब्द पाळण्याचा शब्द मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी देतो .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे