Breaking
ब्रेकिंग

७ वर्षाच्या शिफा आकिल शेखने पहिल्याच रमजानमध्ये पूर्ण केला रोजा.

0 0 7 1 4 6

७ वर्षाच्या शिफा आकिल शेखने पहिल्याच रमजानमध्ये पूर्ण केला रोजा.

रमजान हा पवित्र महिना मुस्लिम समाजासाठी संयम, इबादत आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारा मानला जातो. याच रमजान महिन्यात कोपरगाव शहरातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या अवघ्या सात वर्षाच्या शिफा आकिल शेख हिने पहिल्यांदाच रोजा ठेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे .शिफा आकिल शेख हिने पहिल्याच रमजान मध्ये दिवसभर रोजा( उपवास) यशस्वीरित्या पूर्ण केला.

लहान वय असूनही तिने उपवास करत संयम श्रद्धा आणि धार्मिक शिस्त यांचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे तिच्या या कृतीमुळे कुटुंबासह परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

कुटुंबातील धार्मिक वातावरण संस्कार आणि मार्गदर्शनामुळेच शिफाने लहान वयातच हा धार्मिक उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या रोजाबद्दल तिच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले असून लहान वयातच मुलांनी धार्मिक परंपरा समजून घेतल्या पाहिजे शिफाने दाखवलेला संयम आणि श्रद्धा आम्हाला अभिमानास्पद वाटतो अशी प्रतिक्रिया कुटुंबीयांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे