कोपरगाव शहरात विनापरवाना बाहेरील व्यक्तीकडून बोगस व निकृष्ट दर्जाचा तांदूळ विक्री नागरिकांची होत आहे दिवसाढवळ्या फसवणूक* यावर वचक कोणाचा ?अन्यथा पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन संदीप निरभवने –भा.ज.पा. अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष
कोपरगाव शहरात विनापरवाना बाहेरील व्यक्तीकडून बोगस व निकृष्ट दर्जाचा तांदूळ विक्री नागरिकांची होत आहे दिवसाढवळ्या फसवणूक* यावर वचक कोणाचा ?अन्यथा पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन
संदीप निरभवने –भा.ज.पा. अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष
कोपरगाव शहरामध्ये गेल्या पंधरा-वीस दिवसापासून दोन अज्ञात अनोळखी इसम बोगस, निकृष्ट व दर्जाहीन तांदुळाची विनापरवाना 407 मालवाहू टेम्पो मध्ये विक्री करत असल्याचे आढळले आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व कोपरगाव नगरपालिका यांना निवेदन देण्यात आले आहे

सदरील दोन अनोळखी इसम हे कोपरगाव शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी व चौका चौकात अत्यंत निकृष्ट दर्जाचा तांदूळ हे सरलाट विकत असून ही विक्री करणारे इसम कुठून आले यांना कोणाचे पाठबळ आहे? याबद्दल संशय निर्माण होत आहे हे अनोळखी व्यक्तीची अधिक चौकशी केली असता ते दादागिरीची भाषा करतात व पोलीस व प्रशासन आमचे काही करणार नाही असे उर्मट उत्तर देतात
त्यामुळे हे सर्व काही पोलिसांच्या सहकार्याने चालू आहे का ?असा प्रश्न कोपरगाव शहरातील नागरिकांना पडला आहे
दर्जाहीन तांदूळ हे पोलीस प्रशासनाचे देखरेखखाली होत असल्याचा गंभीर आरोप संदीप निरभवणे यांनी केला आहे या निकृष्ट दर्जेच्या तांदळापासून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका होऊ शकतो तेव्हा पोलीस प्रशासनाने व संबंधित विभाग यांनी यावर त्वरित कार्यवाही करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन समोर करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनाच्या प्रती कोपरगाव तहसीलदार यांनाही पाठवले आहे निवेदनावर असंख्य कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहे

तेव्हा कोपरगाव नगरपरिषद व कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व संबंधित विभाग यावर काय कार्यवाही करते हे शहरातील नागरिक लक्ष ठेवून आहे
यावेळी संदीप तुकाराम निरभवणे, (भा.ज.पा. अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष)
अनिल जाधव,( अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष )अर्जुन सिंगकुशवाह,दिलीप नामदेव म्हस्के, शरद भास्कर निरभवणे,सागर राजू आस्तना,सचिन साईनाथ त्रिभुवन, ( अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष)
जतिन संतोष निरभवणे, ( अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष)
आयान अन्सार सय्यद,गणेश सुभाष खरात,गोकुळ बिडवे,रवी बिडवे यावेळी उपस्थित होते




