Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विशेष अतिथी व्याख्यान

0 0 7 1 4 6

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विशेष अतिथी व्याख्यान

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे विज्ञान मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय विज्ञान दिन २०२६” निमित्त विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रादेशिक संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.अ‍ॅड. भगीरथ शिंदे भूषविणार आहेत.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान क्षेत्रातील नव्या संकल्पना, संशोधनाची दिशा आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या व्याख्यानाचा लाभ परिसरातील सर्व विज्ञान प्रेमी, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घ्यावा,असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. टी. सरोदे व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे