Breaking
ब्रेकिंग

काका कोयटे हे महाराष्ट्रातील सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांपेक्षा उत्कृष्ट उमेदवार – उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार

0 0 7 1 4 6

काका कोयटे हे महाराष्ट्रातील सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांपेक्षा उत्कृष्ट उमेदवार – उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार

कोपरगावला नगराध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रात सर्वात उत्कृष्ट उमेदवार मिळाला आहे!

कोपरगाव नगरपरिषद निवडणूक 2025 साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांची ‘भव्य जाहीर प्रचार सभा’ आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडली.

आमदार आशुतोषदादा काळे कोपरगावमध्ये उत्कृष्ट काम करत असून त्यांची कोपरगावच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तळमळ असते. तसेच ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे हे महाराष्ट्रातील सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांपेक्षा उत्कृष्ट उमेदवार असल्याचे गौरवोद्गार यावेळी उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांनी काढले.

कोपरगावच्या समर्पितपणे कार्य करणारे काका कोयटे हे सहकार सामाजिक उपक्रम आणि संघटन व्यवस्थापन या सर्व क्षेत्रांमध्ये भरीव कार्य करीत आहे. काका कोयटे हे सहकारांमध्ये जे धुरंदर फार बारकाईने अभ्यास करणारे आर्थिक शिस्त बाळगणारे आर्थिक शिस्त लावणारे संस्था अतिशय योग्य पद्धतीने चालवणारे असे जे नेते ओळखले जातात त्याच्यामध्ये हे अनुभवी नेतृत्व म्हणून कोपरगावकरांना आमचे काका कोयटे परिचित आहे.

तुमचा उत्साह तुमची कामाची पद्धत तुमच्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा एक सामर्थ्य कार्य ही आम्ही बघितली गेल्या अनेक वर्ष सहकार क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहून तुम्ही राज्यातल्या सहकारी संस्था विविध उपक्रमाच्या माध्यमातून दिशा देण्याचा काम केलेले त्याचा मी एक साक्षीदार आज महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन त्यांनी पतसंस्थेच्या चळवळीचा अभ्यास प्रशिक्षण आणि प्रगतीसाठी देशभरात व्यापक संवाद साधलेला मित्रांनो आम्ही सगळ्यांनी अनुभवलेला समता च्यां माध्यमातून शिक्षण महिला सक्षमीकरण क्रीडा साहित्य त्याला तसं समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी त्यांचं योगदान सातत्यपूर्ण आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे

 कोपरगाव तालुका व्यापारी महासंघासोबत काम करताना स्थानिक व्यापारी व्यवसाय विकास आणि संघटनात्मक भक्कम पाया याबद्दल देखील त्यांनी अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे
अनेक क्षेत्रांचा त्यांना दांडगा अनुभव आहे सर्वांशी सहज संवाद साधण्याची त्यांची वृत्ती आहे आणि शहर विकासाचे दृष्टीने दूरदृष्टी असलेले काका कोयटे हे कोपरगावच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचा नेतृत्व आहे म्हणून त्या अनुभवी काका कोयटे यांना तरुण तडफदार विजनरी नेतृत्व असणाऱ्या आमच्या आमदार आशुतोष ची खंबीर साथ आहे आणि या सर्वांना माजी आमदार अशोकराव काळे यांचा मार्गदर्शन असल्यामुळे कोपरगावचा विकास अधिक वेगाने होईल याबद्दल मला खात्री आहे

कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी मी शब्दाचा पक्का आहे मी दिलेला शब्द पाळणार आहे मी वेळ भरून देणारा नाहीये मी कामाचा माणूस आहे सकाळी सहा वाजल्यापासून मला काम करायला आवडतं ते विकासाचं कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे