एस.एस.जी.एम. महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकाचे सादरीकरण

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकाचे सादरीकरण
कोपरगाव दि:१८ रयत शिक्षण संस्थे च्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत (NSS) आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अग्निशामक अधिकारी मा. श्री. हेमंत कार्ले प्रमुख पाहुणे लाभले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी अध्यक्षस्थान भूषविले .

प्रमुख मार्गदर्शक श्री. प्रमोद शिनगर यांनी, “विद्यार्थ्यांना अग्नी म्हणजे काय, अग्नीचे प्रकार, आग लागण्याची कारणे,आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना, आग नियंत्रणासाठी वापरावयाचा वायू, संकटकाळात स्वतःची व इतरांची सुरक्षितता कशी राखावी”, याची माहिती त्यांनी दिली.

प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी अध्यक्षीय मनोगतात, “आपत्ती कधीही सांगून येत नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञान प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मौल्यवान वेळेतून मार्गदर्शन केले असून, या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी स्वतःच्या तसेच समाजाच्या सुरक्षिततेसाठी करावा. नैसर्गिक आपत्तींबरोबरच मानवनिर्मित आपत्ती, रासायनिक दुर्घटना, वायूगळती किंवा आग यांसारख्या संकटांमध्ये योग्य उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले”.
सदर प्रसंगी अग्निशमन दलाच्या कार्यपद्धतीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जुनियर विभागाचे प्रभारी उपप्राचार्य श्री. रवींद्र हिंगे यांनी केले. श्री. प्रमोद शिनगर , श्री. विशाल कासार, मा. श्री. संजय विघाते, श्री. घनश्याम कुऱ्हे कला शाखेचे उपप्राचार्य बंडेराव तऱ्हाळ,श्री. कैलास शेळके. यांसह ज्युनिअर विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकात उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनिता आत्रे व श्रीम.रुपाली गाढे तर आभार श्री.संदीप शिंदे यांनी मानले.



