कोपरगावात कडकडीत बंद; व्यापारी वर्गाचा महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगावात कडकडीत बंद; व्यापारी वर्गाचा महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोपरगाव, प्रतिनिधी :
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस दमन आणि नीट (NEET) परीक्षा मुद्द्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.त्यास कोपरगाव वंचित बहुजन आघाडी व कोपरगाव करानी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून शहरात बंद पाळला आहे.

राज्यभर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोपरगाव शहरात व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात आल्याने व्यवहार ठप्प झाले असून बाजारपेठेत शुकशुकाटाचे वातावरण पाहायला मिळाले.

व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होत शासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचविण्याचा प्रयत्न केला. सकाळपासूनच शहरातील प्रमुख व्यापारी संकुले, किरकोळ व घाऊक बाजारपेठा बंद राहिल्याने नेहमीची वर्दळ दिसून आली नाही.

दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रमुख चौक आणि बाजारपेठांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या बंदमुळे व्यापारी व्यवहारांवर परिणाम झाला असला, तरी व्यापारी संघटनांनी हा बंद शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असल्याचे सांगितले. आहे




