संजीवनी युनिव्हर्सिटीच्या चार विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी आयआयटी मध्ये निवड

संजीवनी युनिव्हर्सिटीच्या चार विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी आयआयटी मध्ये निवड
देशातील प्रतिभावान विध्यार्थ्यांच्या गटात संजीवनीच्या विद्यार्थ्यांचा समावेश
कोपरगाव: संजीवनी युनिव्हर्सिटीच्या चार विद्यार्थ्यांची इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी (आयआयटी) गुवाहाटी, आसाम येथे सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. देशातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांमधील प्रतिभावान विद्यार्थ्यांमध्ये संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेचे आणि संशोधनाभिमुख शिक्षणपद्धतीचे द्योतक मानले जात आहे.
स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्षातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (सीएसई) विभागातील दिव्या रावसाहेब वारुळे व रोहन आत्माराम निकम तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (एआयडीएस) विभागातील जय निलेश जोबनपुत्रा व तनिष्क सचिन पहाडे यांची या प्रतिष्ठित इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.

इंटर्नशिपदरम्यान दिव्या वारुळे ही आयआयटी गुवाहाटीतील तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ‘फुल स्टॅक वेब अँड अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट’ या विषयावर संशोधन व प्रकल्प कार्य करणार आहेत. तर रोहम निकम, जय जोबनपुत्रा आणि तनिष्क पहाडे हे ‘एआय, मशीन लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन अँड अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट’ या अत्याधुनिक विषयांवर संशोधनात्मक कार्य करणार आहेत.
आयआयटीने सर्व प्रथम इंटर्नशिपसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून सर्व तपशिलांसह अर्ज मागविले होते. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रा.ज्योतिमई कलिता यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक बाबींच्या पुर्ततेसह अर्ज तयार करून आयआयटीकडे पाठविले. त्यात प्रामुख्याने एआय स्किल्स, काॅम्प्युटर व्हिजन, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, अशा विविध बाबींचा समावेश होता. आयआयटीचे निकष त्यांनी पूर्ण केले आणि त्यांची मुलाखतीमधुन निवड झाली. देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान संस्थेमध्ये संशोधनाची संधी मिळणे ही विध्यार्थ्यांसाठी मोठी उपलब्धी मानली जाते. या निवडीमुळे विध्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे संशोधन वातावरण, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख तसेच उद्योगक्षेत्रातील नव्या संधींचा अनुभव मिळणार आहे.

विध्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष श्री अमित कोल्हे, व्हाईस चांसलर डाॅ. ए.जी. ठाकुर, डीन डाॅ. कविथा राणी, विभागप्रमुख डाॅ. महेंद्र गवळी, डाॅ. किशोर जाधव यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोच्च तांत्रिक संस्थांमध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणे ही संजीवनीसाठी अभिमानाची बाब आहे. आयआयटी गुवाहाटी सारख्या प्रतिष्ठित संस्थेत संशोधनाची संधी मिळणे म्हणजे विध्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि नवोन्मेशी क्षमतेची राष्ट्रीय पातळीवरील दखल होय. यापूर्वीही संजीवनीच्या विध्यार्थ्यांना रशिया , फिलीपाईन्स, कॅनडा, युके, जपान, तैवान, इयादी विविध विद्यापीठांमध्ये संपुर्ण स्काॅलरशिपवर २३० पेक्षा अधिक इंटरर्नशिप पूर्ण करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढविल्या आहेत. अशा संधींमुळे विध्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तांत्रिक ज्ञान, संशोधनाचा अनुभव आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळत आहे.-श्री अमित कोल्हे, प्रेसिडेंट , संजीवनी युनिव्हर्सिटी



