आरोग्य दूत विमल पुंडे वुमन हेल्थ आयकॉन पुरस्काराने सन्मानित

आरोग्य दूत विमल पुंडे वुमन हेल्थ आयकॉन पुरस्काराने सन्मानित
कोपरगाव शहर आणि तालुक्यातील महिला व मुलींच्या आरोग्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून योग शिक्षिका विमलताई पुंडे या अखंडपणे योग वर्गाच्या माध्यमातून काम करत आहे. योग शिक्षिका विमलताई पुंडे यांच्या महिलांच्या आरोग्यासाठी चालू असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना ‘International Naturopathy Organization, Delhi ‘ या आरोग्य विषयक संस्थेने त्यांना ‘Women Health Icon Award ‘ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. महिला दिनाच्या निमित्ताने आरोग्य दूत विमलताई पुंडे यांना हा पुरस्कार प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यातून त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. कोपरगावकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. विमल पुंडे यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे
कोपरगाव शहर आणि तालुक्यातील महिला मुलींच्या आरोग्यासाठी योग शिक्षिका विमलताई पुंडे या नेहमीच कार्यरत आहेत.
वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन त्या पौगंडावस्थेतील मुलींमधील शारीरिक आणि मानसिक बदलांवर, तसेच मासिक पाळीच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर मार्गदर्शन करत असतात. या नैसर्गिक बदलांबाबत किशोरवयीन मुलींना होणाऱ्या बदलांची समज देण्याची फार गरज आहे. या काळात मुलींच्या मनातील कुतूहल, भीती आणि प्रश्नांना वेळीच समाधान कारक उत्तरे देण्याची गरज असते. एका नाजूक टप्प्यावरून परिपक्वतेकडे जाताना, जिथे त्यांना भावनिक आधार आणि योग्य सल्ला मिळणे आवश्यक असते. जेणेकरून युवतींची या विषयावर साक्षरता आणि आरोग्य विषयक भविष्यातील वाटचाल आत्मविश्वासपूर्वक होते.

या कार्यक्रमातून विमलताई या मुलींशी सुसंवाद साधून, त्यांच्यात विश्वास आणि आत्म-शोध या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतात.
आरोग्य दूत’ विमलताई पुंडे यांच्या कार्याचा सर्व नागरिकांना अभिमान वाटत आहे




