Breaking
ब्रेकिंग

शिवसेना बांधकाम कामगार सेना (शिंदे गट ) तर्फे खऱ्या बांधकाम कामगारांना नोंदणीचा लाभ मिळण्यासाठी कामगार आयुक्त यांना निवेदन..

0 0 7 1 4 6

शिवसेना बांधकाम कामगार सेना (शिंदे गट ) तर्फे खऱ्या बांधकाम कामगारांना नोंदणीचा लाभ मिळण्यासाठी कामगार आयुक्त यांना निवेदन..

पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने कामगार सेनेचे अध्यक्ष प्रितमजी धारीया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रमुख विशालजी शिरसाठ यांच्या सहकार्याने व जिल्हा सचिव किशोरजी चोरगे यांच्या नेतृत्वात उत्तर अहिल्यानगर सहाय्यक कामगार आयुक्त यांना खरे वंचित कामगार यांच्या नोंदण्या सार्वजनिक बांधकाम झेड पी ठेकेदाराच्या नियुक्त्याच्या ९०दिवसाच्या प्रमाणपत्रावर होण्या बाबत निवेदन देण्यात आले निवेदनात पुढे म्हंटले आहे कि इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे नगरपालिका ग्राम सेवक व बी ओ सी प्रमाणपत्र असले तरच नोंदणी ग्राह्य धरते

हे आज खरे वंचित पिढीत घटकांसाठी अन्याय कारक आहे आजवर या नोंदणी पासुन खरे अनेक कामगार वंचित राहिले आहे ते आता नोंदणी करायला गेल्यावर अनेक अडचणी येतात या अडचणी कल्याणकारी मंडळाच्या वतीने दुर करून इमारत बांधकाम कामगार यांना न्याय द्यावा व नगरपालिका आणि ग्राम सेवक बी ओ सी या संगेच सार्वजनिक बांधकाम (Pwd)झेड पी ठेकेदाराच्या नियुक्त्याच्या ९०दिवसाच्या प्रमाणपत्रावर नोंदण्या व्हाव्या असे निवेदन उत्तर अहिल्यानगर सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आले यावेळी बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा सचिव किशोरदादा चोरगे तालुकाप्रमुख प्रमुख विलास जाधव शहर प्रमुख मच्छिंद्र शार्दुल शाखा प्रमुख देविदास शार्दुल उपतालुकाप्रमुख कलिम शेख हजर होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे