कोपरगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.
कोपरगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.
घरात घुसून मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली. असून तब्बल 1 लाख 54 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
कोपरगाव पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करून दोन गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.त्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम समाविष्ट आहे .

3 जुले 2025 रोजी रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान साई प्रभा नगर कोपरगाव येथील वंदना दिनेश पवार यांच्या घरात 4 अनोळखी इसम घुसले त्यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने जबरदस्तीने लुटून पसार झाले होते.
फिर्यादी च्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं 400 /2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान प्रसाद भारत पांडव वय वर्ष 25 रां. वेरूळ खुलताबाद जि संभाजी नगर,आशिष राजाराम भोसले वय 19 रा बोल्हेवडी सावेडी जि अहमदनगर ,ऋषिकेश नवनाथ धाकतोडे गेवराई ता नेवासा,शिवम उर्फ पवन रमेश भालेराव वय वर्ष 21 रा खडकी ता कोपरगाव.
कोपरगाव शहर पोलिसांनी उपनिरीक्षक संजय पवार यांच्या पथकाने आरोपींना पुणे येथे पकडुन 7 ऑक्टोंबर रोजी कोपरगाव येथे आणून अटक केली.आरोपींनी गुन्ह्यातील सोने अहिल्यानगर येथील सोनाराला विकले .

पुढील तपासात आरोपी शिवम भालेराव याने कबुली दिली की त्याने आपल्या साथीदारासह 30 जून 2025 रोजी कोपरगाव शिर्डी रोडवर आत्मा मालिक जवळ उभ्या असलेल्या ट्रक चालकावर हल्ला करून रोख रक्कम व फोन पे द्वारे बळजबरीने पैसे घेतले होते.सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी दोन गंभीर गुन्ह्याचा छडा लावला आहे





