पत्रकारांच्या मागण्या समजून घेतल्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात..

पत्रकारांच्या मागण्या समजून घेतल्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात..
पत्रकार निलेश सोमाणी यांचा पुढाकार. वाशिम.. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्या व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पत्रकार निलेश सोमाणी यांनी वाशिम मंगरुळपीर विधानसभा आमदार श्याम खोडे यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले.
वाशिम येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात घेतलेल्या ठरावाची प्रत मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. पत्रकारांचे आर्थिक विकास महामंडळ व वृत्तपत्र विक्रेत्यांचे महामंडळ लवकर स्थापन करून पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी यावेळी निलेश सोमाणी यांनी केली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने आमदार श्याम खोडे व निलेश सोमाणी यांच्या हस्ते पत्रकारांच्या अधिवेशनात सर्वांना देण्यात आलेली विशेष भेटवस्तू किट देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारांच्या मागण्यांच्या संदर्भात शासन सकारात्मक असून लवकरच पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लावू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले




