Breaking
ब्रेकिंग

नेट-सेट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन : एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचा उपक्रम

0 0 7 1 4 6

नेट-सेट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन : एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचा उपक्रम

कोपरगाव: रयत शिक्षण संस्था संचलित श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे करिअर मार्गदर्शन व सायनशास्त्र विभागाच्या वतीने नेट/सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना नेट व सेट परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाची दिशा तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत यांनी भूषविले.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. नरेंद्र फटांगरे यांनी नेट-सेट परीक्षेचे महत्त्व स्पष्ट करत योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि संदर्भग्रंथांच्या वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी या परीक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. व्ही. बी. गाडे यांनी केले. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. व्ही. डी. थोरात यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. श्रीमती पी. व्ही. रांधवणे यांनी मानले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे