Breaking
ब्रेकिंग

डान्स कोपरगाव डान्स’मध्ये संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या गणेश वंदनेचा डंका; पटकावला द्वितीय क्रमांक

0 0 7 1 4 6

‘डान्स कोपरगाव डान्स’मध्ये संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या गणेश वंदनेचा डंका; पटकावला द्वितीय क्रमांक


संत ज्ञानेश्वर स्कूलच्या डान्स ग्रुपचा दिमाखदार विजय.
कोपरगाव:येथील लायन्स, लिनेस, लिओ क्लब आणि क्रेडाई कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक्स्पो २०२६’ (वर्ष १३ वे) अंतर्गत ‘लिटिल चॅम्प’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचा उत्स्फूर्त आविष्कार सादर करत द्वितीय क्रमांकावर मोहोर उमटवली.

गणेश वंदनेने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात:
कार्यक्रमाची सुरुवातच संत ज्ञानेश्वर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अतिशय सुंदर आणि प्रभावी ‘गणेश वंदने’ने झाली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध हालचाली, वेशभूषा आणि सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक व परीक्षकांना मंत्रमुग्ध केले. या सादरीकरणाचे सर्वांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

सन्मान चिन्ह व रोख बक्षिसाने गौरव:
विविध शाळांच्या चुरशीच्या स्पर्धेत संत ज्ञानेश्वर स्कूलच्या डान्स ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते शाळेला सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. हे यश स्वीकारताना शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे, शिक्षिका वैष्णवी काळे, सई कापसे, रवी पवार व सर्व विजयी विद्यार्थी उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने अभिनंदन:
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ‘संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थे’चे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मा. श्री. राजेंद्रजी झावरे व कार्यकारी विश्वस्त श्री. विशालजी झावरे यांनी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पालकांकडून कृतज्ञता:
केवळ शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळा नेहमीच पुढाकार घेते. अशा मोठ्या व्यासपीठावर विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांनी शाळेचे विशेष आभार मानले व कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे