Breaking
ब्रेकिंग

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात मातापालक मेळावा उत्साहात संपन्न

0 1 1 9 0 6

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात मातापालक मेळावा उत्साहात संपन्न

कोपरगाव :रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयात मातापालकमेळावा प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.

यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य श्री. रवींद्र हिंगे, पर्यवेक्षक श्री. माधव रेवगडे , सायन्सविभाग प्रमुख अण्णासाहेब गोराणे तसेच कला विभाग प्रमुख कलावती देशमुख उपस्थित होते. त्यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देतानाच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधी व प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.

प्रमुख मार्गदर्शक डॉ. अर्जुन भागवत यांनी काळानुसार शिक्षण व्यवस्था बदलली जात आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांची मेहनत या तिन्ही घटकांचा समन्वय महत्त्वाचा ठरतो. . विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे व क्षमतेचे क्षेत्र निवडून त्यामध्ये करिअर घडवावे,” असे प्रतिपादन केले.

यावेळी मातापालक प्रतिनिधी सौ. कुंदा जाधव, सौ. कविता मराठे, सौ. चंद्राविकास गव्हाणे. यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना व अपेक्षा मांडल्या. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील समन्वयातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अधिक प्रभावी दिशा मिळू शकते, असा सूर त्यांच्या मनोगतातून व्यक्त झाला.

या मेळाव्यास पालक, विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक माधव रेवगडे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती सुनिता आत्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ विद्या खैरे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 9 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे