Breaking
ब्रेकिंग

संवत्सर येथे रेल्वे पुलावर अज्ञात इसमाचा संशयास्पद मृत्यू; अपघात की घातपात? तपास सुरू

0 1 1 9 0 6

संवत्सर येथे रेल्वे पुलावर अज्ञात इसमाचा संशयास्पद मृत्यू; अपघात की घातपात? तपास सुरू


कोपरगाव (प्रतिनिधी): कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीतील दौंड–मनमाड रेल्वे मार्गावरील रामशिंगाबाबा मंदिराजवळील पुलावर शुक्रवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच मनमाड रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मात्र हा प्रकार अपघाताचा आहे की घातपाताचा, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.


मृत इसम हा मध्यम उंचीचा, गोऱ्या वर्णाचा असून त्याने पांढरा शर्ट, राखाडी रंगाची पँट परिधान केली होती. त्याची दाढी पांढरी व खुंटलेली असून वय अंदाजे ५५ ते ५६ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नसून तो रेल्वे प्रवासी असावा आणि प्रवासादरम्यान पुलावरून खाली पडला असावा, असा प्राथमिक कयास रेल्वे पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी अद्याप मनमाड रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती मिळाली आहे. मृत इसमाची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिस प्रयत्नशील असून संबंधित व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास तातडीने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

2/5 - (1 vote)

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 9 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे