Breaking
ब्रेकिंग

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, अन्यथा नगरपालिकेवर लवकरच हल्लाबोल मोर्चा!

0 0 7 1 4 6

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, अन्यथा नगरपालिकेवर लवकरच हल्लाबोल मोर्चा!

कोपरगाव शहरातील गांधीनगर भागांमधील अल्ताफ पठाण यांना काल दिनांक 19 5 2025 रोजी मोकाट जनावरांनी धडक देऊन गंभीर जखमी केले आहे

 त्यांच्यावरती कोपरगाव शहरातील कोठारी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यात आले आहे याचेच कारण लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी  कोपरगाव नगरपालिकेला  निवेदन दिले आहे त्यांनी निवेदनात स्पष्ट सांगितले आहे की आता पर्यंत गांधीनगर इंदिरानगर, हनुमान नगर या भागात चार ते पाच घटना मोकाट जनावरांच्या घडल्या असून नगरपालिकेने लवकरात लवकर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा येत्या 28 – 5 -2025 रोजी हल्लाबोल मोर्चा सर्व नागरिक महिला घेऊन येणार असल्याची माहिती अकिल मेहंदी यांनी दिली आहे

मोकाट जनावरे यांच्या हल्ल्यात जखमी झालेले अल्ताफ पठाण यांना गंभीर जखम होऊन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.अल्ताफ पठाण म्हणाले की मला मोठ्याप्रमाणात गंभीर जखम झाली आहे .मोकाट जनावरांचा वृध्द नागरिक ,लहान मुले यांच्यावर हल्ला झाल्यास मोठा अनर्थ घडू शकतो त्यामुळे नगरपालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा

 

 त्यांच्या समवेत या निवेदनात अमोल ससाने, लियाकत शेख, वसीम पठाण,सागर आहेर, अमजत पठाण सह अनेक नागरिकांनी  स्वाक्षऱ्या केल्या आहेत

शहरातील विविध रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे कळपा -कळपाने फिरत आहेत तर रस्त्याच्या मध्यभागी थांबून रस्त्यावर बसत आहेत. यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. काही रस्त्यावर अचानकपणे हे मोकाट जनावरे हल्ला करीत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी होत आहे.मोकाट जनावरांचा  त्रास होत असल्याने नागरिक संतापले आहेत 

दोन जनावरांमध्ये कोपरगाव शहरात नेहमी झुंज होत असल्याने अनेक नागरिक जखमी होत आहे .या जनावरांचा नगरपालिकेने बंदोबस्त करणे गरजेचे आहे.अनेक वेळा जनावरांचा  धक्का लागल्याने  महिला व लहान मुले  जखमी झाल्याची घटना घडली आहे .

त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांबरोबरच विद्यार्थी, वृद्ध यांच्यामध्ये दहशत निर्माण झाली आहे.नगरपालिकेने मोकाट जनावरांवर कारवाई न केल्यास नागरिक हल्लाबोल मोर्चा करणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे