जनतेचा विश्वास, प्रभावी नेतृत्व गुण – श्री राजेंद्र दत्तात्रय सोनवणे

जनतेचा विश्वास, प्रभावी नेतृत्व गुण – श्री राजेंद्र दत्तात्रय सोनवणे
प्रभावी नेतृत्व गुण प्रामाणिकपणा, स्पष्ट संवाद, दूरदृष्टी, जबाबदारीची जाणीव, आणि युवकांना प्रेरित करण्याची क्षमता. एक चांगला नेता , कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे आणि जनतेच्या गरजांना प्राधान्य देणे यामुळे राजेंद्र सोनवणे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे.तरुण तडफदार,युवकांचा हक्काचा आवाज असल्याने राजेंद्र सोनवणे यांचे नाव सर्वात चर्चेत आहे

सोनवणे हे खेळाडू वृत्तीचे,शांत स्वभावाचे,पारदर्शक कामकाज ही त्यांची ओळख आहे.
नागरिकांच्या समस्या जलद सोडविण्यावर त्यांचा भर असल्याने सामान्य नागरिकांना सोनवणे हे हक्काचे व्यक्तिमत्त्व वाटतात.कोल्हे साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.
शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृढ पाया रचण्यात त्यांचा कोल्हे साहेब व आदरणीय बिपीन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाचा वाटा आहे. नागरिकांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण,प्रामाणिक प्रशासन ,आणि पारदर्शक कामकाज हीच त्यांची ओळख आहे

राजेंद्र सोनवणे यांनी शहरात अनेक विकास कामे राबविली.सोनवणे परिवारावर जनतेचे अतूट नाते राहिले आहे.जनतेच्या विश्वासावर खरे उतरणारे नेतृत्व म्हणून राजेंद्र सोनवणे यांना बघितले जाते.






