Breaking
ब्रेकिंग

कोपरगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. तलवारबाज, जुगार अड्डे आणि दारू विक्रेत्यांवर कारवाई!

0 0 7 1 4 6

कोपरगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.
तलवारबाज, जुगार अड्डे आणि दारू विक्रेत्यांवर कारवाई!

आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोपरगाव येथे दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ अखेर राबवण्यात आलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये पोलिसांनी गुन्हेगारीवर मोठा प्रहार करत शहरातील विविध भागात अवैध धंद्यांचे जाळे उद्ध्वस्त केले असून हनुमाननगर परिसरात अर्जुन राजु सोनवणे (३२) व विशाल संजय जगधने (२०) हे दोघे इसम सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे तलवार जवळ बाळगत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले

, त्याचवेळी महादेवनगर येथे जुगार अड्ड्यावर कारवाई करत हर्षल सुरेश गवळी (२६) व किशोर शंकर दिक्षीत (५६) यांना रंगेहात पकडून ३,७५० रुपये रोख व साहित्य जप्त करण्यात आले, तसेच जेऊर पाटोदा परिसर व बुद्धविहाराजवळील भागात गावठी हातभट्टी दारूविक्रीवर छापे टाकून बाळासाहेब केशव आहेर (५७) व गोरख बळीराम पवार (३४) यांच्याकडून ४० लिटर तयार दारू व ४०० लिटर कच्चे रसायन जप्त करून पंचासमक्ष तात्काळ नष्ट करण्यात आले आणि सुमारे २९,३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, याच मोहिमेत शहरातील विविध ठिकाणी आरोग्यास अपायकारक तंबाखूमिश्रित मावा विक्री करणाऱ्या साहील उमर कुरेशी (१९) व नदीम सलीम शेख (३५) यांच्यावरही गुन्हे दाखल करून अडीच किलो मावा व पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले असून ही धडक मोहीम १७ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाली असली तरी पुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई पोलिसांकडून सातत्याने सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व त्यांच्या पथकाने केली.आगामी सणासुदीच्या काळात शहरात अशा प्रकारचे कॉम्बिंग ऑपरेशन सुरुच राहणार असून बेकायदेशीर कृत्यावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे