Breaking
ब्रेकिंग

धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद..

0 0 7 1 4 6

धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद..

कोपरगावात पुन्हा बिबट्या जेरबंद .बिबट्याला जेरबंद केल्यामुळे खिर्डी गणेश टाकळी फाटा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.खिर्डी गणेश टाकळी फाटा परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.बिबट्याने दोन जीवांचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना होती.

अनेक ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झाले होते. आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केल्याने वनविभाग खडबडून जागे झाले.अखेर वनविभागाने आज मंगळवार सायंकाळी बिबट्याचे दर्शन होताच बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.आज सकाळी स्थानिक रहिवाशी दादा बाबर आपल्या मुलांना शाळेत सोडवण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यात बिबट्याचे दर्शन झाले.

त्यांनी तात्काळ ही माहिती वनविभागाला दिली.माहिती मिळताच वनविभागाची टीम घटना स्थळी दाखल झाली .त्यांनी लगेच बिबट्याचा शोध सुरू केला .तब्बल सात तासांच्या अथक परिश्रमाने बिबट्याला जेरबंद करण्यात आले.शंकर आहेर यांच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याला वनविभागाच्यां शार्प शूटर ने बेशुद्ध करून जेरबंद केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे