योगाचार्य उत्तमभाई शहा यांना जीवन गौरव पुरस्कार
योगाचार्य व ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री.उत्तमभाई शहा यांचा समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मानाचा “जीवन गौरव पुरस्कार”
21 जून 25 रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून कोपरगावातील सर्वात ज्येष्ठ योगाचार्य व ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री.उत्तमभाई शहा यांचा समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मानाचा “जीवन गौरव पुरस्कार” देऊन सत्कार करण्यात आला. अत्यंत योग्य उचित माणसाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी अभिनंदन करतो..!
माजी.खासदार श्री.सदाशिवराव लोखंडे यांच्या खासदार निधीतून (साई सिटी) येथे योग भवन बांधण्यात आले सौ.सुधाताई ठोळे यांनी मोठ्या मनाने व परोपकार वृत्तीने नेहमीप्रमाणे ठोळे परिवाराच्या उदारतेने ही जागा योगभावनासाठी उपलब्ध करून दिली,त्यांचे कोपरगाव शहरावर हे फार मोठे उपकार आहे. ही योग भवनाची वास्तू नक्कीच कोपरगावकरांना भविष्यात आरोग्य प्रदान करील अशी अपेक्षा ! सामाजिक सहृदयता व सामाजिक सेवेला नेहमीप्रमाणे आदरणीय श्री.काकासाहेब कोयटे यांनी श्री.उत्तमभाई यांच्या कार्याची दखल घेतली त्यामुळेच हा कार्यक्रम घडून आला.
देशाचे पंतप्रधान आदरणीय.नरेंद्रभाई मोदी यांनी हा योग विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन योगाचे महत्त्व जनतेला समजून सांगितले.
श्री.उत्तमभाई शहा 1970 सालापासून म्हणजे गेली 55 वर्ष कोपरगाव जनतेला योगाचे शिक्षण देत आहे. त्या काळात योगाचे महत्त्व व प्रसिद्धी नव्हती, त्या काळात ग्रामीण भागात श्री. भाईनी योग रुजवला ही त्यांच्या जीवनाची खरी कमाई आहे अस मी मानतो.
अलीकडच्या काळात ताण-तणावामुळे या योगाचे महत्त्व त्यांनी विशद केले आहे. शरीर,श्वास व मन यांना जोडणारी साधना म्हणजे योग अशी सहज व सोपी व्याख्या त्यांनी सांगितले आहे. कोरोना काळात योग शिक्षण जनतेला खूप काम आले असंख्यांचे प्राण वाचले कोरोना गेल्यानंतर सुद्धा कमकुवत झालेले फुफ्फुसाना प्राणायामामुळे त्यांना नवचैतन्य मिळाले आहे. असे विचार उत्तम भाई शहा यांनी मांडले.
कोपरगाव नगरपालिकेने श्री.भाईंच्या या कार्याची दखल पूर्वीच 2006 साली “योगाचार्य” ही पदवी व मानपत्र देऊन सन्मान केला. श्री.उत्तम भाई शहा यांच्या धर्मपत्नी धनवंतीबाई (भाभी) यांनी योगाचे शिक्षण घेऊन त्या काळात महिलांना योग शिकवले ही नोंद घ्यावीच लागेल. सौ.धनवंती बाईचे आई-वडील स्वतंत्र सैनिक व गांधी विचार सरणी मुळे योग शिक्षण घेण्यात व देण्यात त्यांना कोणतीच अडचण आली नाही.
आजही 85 व्या वर्षी श्री.भाई निरोगी व आनंदी असतात.असा अभिमानाने ते सांगतात आपल्या दैनंदिन कार्यक्रम व्यवस्थित ठेवा. व्यसन करू नका, उत्तम सकस आहार खा असे ते आवर्जून सांगतात.
त्यांचे सुपुत्र श्री.अभिजीतजी शहा हे सुद्धा आज कोपरगाव जनतेला योग प्राणायामचे शिक्षण देत आहे. माझ्यासारखे व्यापारी,डॉक्टर, प्रसिद्ध नेते, अधिकारी व सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे योगा अभ्यासाला येतात जीवन कस जगाव.हे अभिजीत शहा सहज व सोप्या भाषेत समजून सांगतात कोपरगावातील (आत्मा मालिक,संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज) वगैरे अनेक महाविद्यालयात योग शिक्षक म्हणून जातात. भविष्यात त्यांच्या या कार्याची समाज नक्कीच नोंद घेईल असा मला विश्वास वाटतो.
जीवन हे कॅसेट प्रमाणे आहे पण त्याला फॉरवर्डच बटन नाही याची नोंद जनतेने घ्यावी.
श्री.उत्तम भाई शहा (भाभी) धनवंतीबाई,सुपुत्र.श्री अभिजीत शहा व त्यांच्या सौभाग्यवती सुवर्णा यांना परमेश्वर उदंड व निरोगी आयुष्य देईलच कारण परमेश्वराला त्यांच्याबरोबर आमच्याही आरोग्याची काळजी आहे पुन्च्छ एकदा अभिनंदन…..!
(नारायण शेठ अग्रवाल,कोपरगाव.
*मो.9822630330*




