कोपरगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
कोपरगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी, हातभट्टी दारू विरुद्ध मोहीम तीव्र रू. 39.700 चा माल उध्वस्त गुन्हा दाखल
शहरातील मनाई वस्ती, संवत्सर तालुका कोपरगाव येथे नारंदा नदीच्या कडेला काटवनात मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशन स्टाफने आज दिनांक30/06/2025 रोजी सकाळी 07.45 वा.छापा मारला असता सदर ठिकाणी कच्चे रसायन , उकळते रसायन व तयार दारू, ड्रम, कॅन व इतर साहित्य असे एकूण 39,700/- रुपये चा मुद्देमाल मिळून आला असून सर्व
मुद्देमाल नाश करून गावठी दारू तयार करणारी हातभट्टी पूर्ण पने उद्ध्वस्त केली आहे.
सदर बाबत पो कॉ/2563 गणेश वशिष्ठ काकडे यांचे फिर्यादी वरून महिला आरोपी मंदाबाईं बळीराम आहेर रा.मनाईवस्ती ता.कोपरगाव यांचे विरुद्ध कोपरगाव शहर पो.स्टे.गु र.न. 345 /2025 प्रो.अ.क.65 (फ)(क)(ड)(इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन ने अवैध व्यवसाय विरुद्ध आपली मोहीम तीव्र केल्याने एकच खळबळ उडाली आहे
सदरची धडाकेबाज कामगिरी कारवाई हि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर, .अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबरमे श्रीरामपूर विभाग, उप विभागीय पोलिस अधिकारी शीरीष वमने शिर्डी यांचे मार्गदर्शना खाली
पोलीस निरीक्षक .रामकृष्ण कुंभार शहर पोलिस स्टेशन, दीपक रोठे,पोलिस उपनिरीक्षक, संदीप सोने, पोलिस उपनिरीक्षक, पो. कॉ. गणेश काकडे, पो. कॉ. श्रीकांत कुऱ्हाडे यांनी हि यशस्वी कामगिरी केली आहे.




