कठोर मेहनत व परिश्रमाने परिस्थितीवर मात करता येते”- ॲड सोनल पोळ

कठोर मेहनत व परिश्रमाने परिस्थितीवर मात करता येते”- ॲड सोनल पोळ
कोपरगाव
मनात प्रचंड जिद्द व कठोर मेहनत करण्याची तयारी असेल तर परिस्थितीवर मात करता येते असे गौरव उद्गार कोपरगाव वकील संघाच्या महिला उपाध्यक्ष यांनी व्यक्त केले.
कोपरगाव येथील उषाताई पवार यांची नुकतीच पोलीस उप अधीक्षक (डी वाय एस पी)म्हणून नियुक्ती झाली त्यानिमित्ताने कोपरगाव वकील संघाच्या महिला उपाध्यक्ष सोनल पोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी उषाताई पवार यांचा सत्कार केला उषाताई पवार यांनी या सत्काराने मी भारावून गेले असून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील मनात जिद्द ठेवून प्रशासकीय सेवेत जायचेच हा मनाशी ठाम निर्धार केला. प्रतिकूल परिस्थितीने खचून न जाता मनात प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवली व अनेकदा परीक्षा देऊन देखील अपयश आले असताना खचून न जाता पुन्हा प्रयत्न सुरूच ठेवले व त्या प्रयत्नाचे आज चीज झाले असून मला पोलीस उपअधीक्षक पदावर काम करण्याची संधी मिळाली या संधीचा उपयोग समाजातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी करत राहील
यावेळी वकील संघाच्या माजी महिला उपाध्यक्ष ॲड ज्योती भुसे,ॲड करुणा सोनवणे, ॲड स्वाती मैले,ॲड निर्गम आधी महिला वकील सदस्य उपस्थित होत्या




