Breaking
ब्रेकिंग

वकिलाची फी थकवली; न्यायालयाने व्याजासह रक्कम देण्याचे दिले आदेश

0 1 1 9 0 6

वकिलाची फी थकवली; न्यायालयाने व्याजासह रक्कम देण्याचे दिले आदेश

कल्याण : एका घटस्फोटाच्या प्रकरणात वकिलाची फी थकवणाऱ्या अशिलाला कल्याण दिवाणी न्यायालयाने दणका दिला आहे. वकील हरीश नायर यांनी त्यांचे अशील उमेश भोईर यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. भोईर यांनी ठरलेल्या ५० हजार रुपयांच्या फीपैकी केवळ १५ हजार रुपये दिले होते.
उर्वरित ३५ हजार रुपये ६ टक्के व्याजासह देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वकिलांना त्यांच्या फीसाठी न्यायालयीन लढाई करावी लागल्याचे हे दुर्मिळ उदाहरण ठरले आहे.
नेमके काय प्रकरण?
वकील हरीश नायर यांनी उमेश भोईर यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणात बाजू मांडली होती. या कामासाठी ५० हजार रुपये फी ठरवण्यात आली होती. मात्र, भोईर यांनी केवळ १५ हजार रुपये दिले. उर्वरित ३५ हजार रुपयांची फी नायर यांनी वारंवार मागितली; मात्र पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
त्यानंतर नायर यांनी कल्याण दिवाणी न्यायालयात भोईर यांच्याविरोधात २०२२ मध्ये दावा दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने समन्स बजावूनही भोईर न्यायालयासमोर हजर राहिले नाहीत. नायर यांनी नोटीस व कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे दावा सिद्ध केला.
कल्याण दिवाणी न्यायाधीश संतोष आगे यांनी भोईर यांना वकील नायर यांची थकीत ३५ हजार रुपयांची फी आणि दावा दाखल केल्याच्या तारखेपासून वसुलीपर्यंत ६ टक्के व्याज एक महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 9 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे