माननीय खासदार वाकचौरे साहेबांच्या पुढाकारातून हजारों तरुणांना नोकरी-ना.उदय सामंत

माननीय खासदार वाकचौरे साहेबांच्या पुढाकारातून हजारों तरुणांना नोकरी-ना.उदय सामंत
3255 नोंदणी / 1570 नियुक्तीपत्र वाटप / 1390 जॉब कार्ड वाटप /
जिल्हातील सर्वात मोठा खुला मेळावा
शिर्डी, दि.९ (वार्ताहर) जिल्ह्यातील सर्वात मोठा खुला नोकरी मेळावा खासदार वाकचौरे यांच्या पुढाकारातून होत असून यात हजारो तरुणांना नोकरीं मिळतेय, त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री मा.ना.उदय सामंत यांनी आपल्या भाषणात दिली. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना केवळ नोकरी मिळवून देणे हा रोजगार मेळाव्याचा उद्देश नसून, त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार योग्य व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच स्थानिक पातळीवर उद्योजक घडवण्यासाठी मदतीचा हाथ देणाऱ्या आजच्या मेळाव्यातील अप्रतिम नियोजन आणि शिस्तबद्ध निवड प्रक्रिया बघून आनंद नोकरीं मेळाव्यात आनंद झाल्याची जाहीर भावना व्यक्त केली. आत्मा मालिक संकुल कोकमठाण येथे नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा तें बोलत होते.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या सुचनेवरून शिर्डी लोकसभा मतदार संघात भव्य “आनंद नोकरी मेळाव्या”चे आयोजन करण्यात आले होते. यात राज्याचे उद्योगमंत्री मा.ना.उदय सामंत यांच्या शुभहस्ते मेळाव्याचा भव्य शुभारंभ करण्यात आला. यावेळी आत्मा मालिक ध्यानपीठचे पूज्यनीय परमानंदगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तर शिवसेनेच्या संपर्कप्रमुख,खासदार ज्योतीताई वाघमारे,आमदार विठ्ठलराव लंघे,आमदार अमोल खताळ,आमदार विवेक कोल्हे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

ग्रामीण तरुणांच्या हाताला काम आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी’
आनंद नोकरी मेळावा २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी मेळाव्यात पाच तरुणांना उद्योगमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आले.

ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन खा.वाकचौरे यांच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगाराचे नवे मार्ग खुले झाल्याची भावना खा.ज्योतीताई वाघमारे यांनी व्यक्त केली. यावेळी पूज्यनीय परमानंद महाराजांनी तरुणांना उपदेश करत अशा मेळाव्यातून आत्मा मालिकचा संदेश दिला. या मेळाव्याचे सह प्रयोजक पुणे येथील युवा हब मॅनेजमेंट कंपनीने शेवटी आकडेवारी जाहीर केली. यानुसार मेळाव्यात एकूण 3255 जणांनी उस्फुर्त नोंदणी केलेली होती, त्यातील मुलाखती दिलेल्या 1570 युवक युवतीना नियुक्तीपत्र देण्यात आले तर नोकरी न मिळालेल्या एकूण 1390 जणांना जॉब कार्ड वाटण्यात आले, ज्यानुसार त्यांना पण येत्या सहा महिन्यात नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. या मेळाव्यात विशेषतः अंध-अपंग आणि महिलांची मोठी उपस्थिती होती. यात मान्यता पाटील, मेघना ऋषिकेश, साईराज पाटील आणि पायल पवार यांना नामांकित ‘जेसीबी’ कंपनीमध्ये, तर समीर राऊत याला ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या अग्रगण्य कंपनीमध्ये तात्काळ नियुक्तिपत्रे देण्यात आली. ‘आनंद नोकरी मेळावा २०२६’ मुळे परिसरातील हजारो तरुणांना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध झाल्या असून, आगामी काळातही अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत कार्यक्रमाचे संयोजक मुकुंद सिनगर यांनी व्यक्त केले.

सर्वात प्रथम दीपप्रज्वलन आणि स्वागत गीताने मेळाव्याची सुरुवात झाली. प्रास्ताविक युवा नेते रोहित वाकचौरे यांनी करताना नोकरी मेळाव्याची संकल्पना विषद केली. युवासेनेच्या माध्यमातून असे कार्यक्रम वारंवार घेणार असून लवकरच मतदार संघात युवकांचे मजबूत संघटन उभे करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामीण भागातील तरुणांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासू नये, या उद्देशाने एकाच व्यासपीठावर विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देशातील नामांकित कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या असून यापुढील काळात अशा मेळाव्यांच्या माध्यमातून दहा हजार तरुणांना रोजगार देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पंचगंगा उद्योग समूहाचे संस्थापक प्रभाकर काका शिंदे, डॉ.जालिंदर भोर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीन औताडे, युवा हबचे संचालक दीपक पवार, किरण राहाणे, साईअर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा सरस्वतीताई वाकचौरे, श्वेता वाकचौरे-भांबरे, स्मिता वाकचौरे-वाघ यांच्यासह शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, युवासैनिक, महिला आघाडी आणि विशेषतः सर्वं नामांकित कंपन्यांचे HR प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेंसाठी संयोजक बाळासाहेब पवार, मुकुंद सिनगर, ज्ञानेश्वर सानप, भाऊ वाकचौरे, सचिन मलिक, ज्ञानेश्वर कपिले, तान्हाजी लामखडे, अशोक पवार, रवि सोनवणे, प्रवीण फरगडे, रिंकेश जाधव, मोहन होन, श्रीराम कदम, योगेश बारसे, ओंकार गोंदकर, तनिष जैन, दत्ता डोंगरे, बाबासाहेब कुसेकर, सोमनाथ गोरे, मच्छिन्द्र भवर, अमोल साखरे, अक्षय जाधव, अनिल कापसे यांच्यासह बाप कंपनीतील 20 स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. यात आत्मा मालिक योगमिशन अनुयायी यांनी अनमोल सहकार्य केले.
सूत्रसंचालन सागर करडे व ज्ञानेश्वर सानप यांनी तर शेवटी मुकुंद सिनगर यांनी सर्वांचे आभार मानले.



