कोपरगाव आगारातील वाहतूक नियंत्रक गौतम खरात यांना ‘लालपरी गौरव’ पुरस्कार

कोपरगाव आगारातील वाहतूक नियंत्रक गौतम खरात यांना ‘लालपरी गौरव’ पुरस्कार
कोपरगाव, प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) कोपरगाव आगारातील वाहतूक नियंत्रक श्री. गौतम अशोक खरात यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘लालपरी गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्री. खरात यांनी आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करत महामंडळाची प्रतिमा उंचावण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. विशेषतः शालेय पास विक्री वाढविणे, आगाराच्या उत्पन्नात सातत्याने वाढ घडवून आणणे, तसेच अर्थविनायक यात्रेसाठी भाविकांचे प्रभावी प्रबोधन करणे या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
याशिवाय, प्रवाशांना अधिकाधिक यूपीआय पेमेंटचा वापर करण्यास प्रोत्साहित करून डिजिटल व्यवहारांना चालना दिली. त्यांच्या या उत्कृष्ट आणि परिणामकारक कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांना ‘लालपरी गौरव’ पुरस्कार जाहीर केला आहे.
या यशाबद्दल कोपरगाव आगारातील अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी श्री. गौतम खरात यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
“कर्तव्यनिष्ठा, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रवासी सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे गौतम खरात यांचा ‘लालपरी गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे,” अशी भावना आगारातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.



