Breaking
ब्रेकिंग

एस.एस.जी.एम.कॉलेज मध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा, उत्साहात साजरा

0 1 1 9 0 6

एस.एस.जी.एम.कॉलेज मध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा, उत्साहात साजरा

कोपरगाव, दि. २९ : रयत शिक्षण संस्थेचे, श्री सद्‌गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स व संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त रयत माउली कृतज्ञता दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक डॉ. सुनिता आत्रे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष डॉ. भगत सर यांच्या हस्ते करण्यात आला. संगीता मालकर, किरण डागा, विमल पुंडे,कावेरी राऊत,किरण जपे, नूतन सरोदे मॅडम, डॉ. सोनल वाबळे आणि डॉ. मंजुषा वाकचौरे यावेळी उपस्थित होत्या. समाजसेविका संगीता मालकर यांनी “वर्तनातील बदल हा कृतीतून घडतो” असे प्रतिपादन केले. किरण डागा यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा हे सांगितले. विमलताई पुंडे यांनी योग व प्राणायाम याचे महत्व पटवून दिले. डॉ. मंजुषा वाकचौरे यांनी स्वःतचे अस्तित्व निर्माण करण्यास सांगितले.

सदर कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक माधव रेवगडे, विज्ञान, वाणिज्य व कला विभागा‌तील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महावि‌द्यालयाचे विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. भगत यांनी अध्यक्षस्थान भूषवले. अध्यक्षीय मनोगतात “कर्तृत्ववान महिला म्हणजे आपली आई आहे, तिचा सन्मान नेहमी केला पाहिजे”,असे विचार मांडले. या कार्यक्रमाचे आभार विद्या देवकर यांनी मानले. सूत्रसंचालन जयश्री शेंडगे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 9 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे