धारणगावात दोन दुचाकींची समोरासमोर धडक; शेतकऱ्याचा मृत्यू, एक गंभीर

धारणगावात दोन दुचाकींची समोरासमोर धडक; शेतकऱ्याचा मृत्यू, एक गंभीर
कोपरगाव–कोळपेवाडी मार्गावरील युवराज रनशूर स्मारकाजवळ भीषण अपघात; रस्त्यावरील वाळू व वाहनांच्या वेगाचा प्रश्न ऐरणीवर
कोपरगाव : तालुक्यातील धारणगाव येथे कोपरगाव–कोळपेवाडी मार्गावर युवराज रनशूर स्मारकाजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बाळासाहेब दामू घुमरे (रा. कोळगाव सांगवी) यांचा मृत्यू झाला, तर अनिल खाजेकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब घुमरे हे शेतीच्या कामासाठी बियाणे घेऊन मोटारसायकलवरून जात होते. त्याचवेळी कोळपेवाडीहून कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या अनिल खाजेकर यांच्या दुचाकीची घुमरे यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.

उपचारादरम्यान बाळासाहेब घुमरे यांचा मृत्यू झाला. तर अनिल खाजेकर यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी कोपरगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
रस्त्यावरील वाळूमुळे अपघाताचा धोका
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव–कोळपेवाडी मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने वाहनांचा वेग मोठा असतो. त्यातच मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करणारी वाहने या मार्गावरून ये-जा करत असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर वाळू सांडलेली दिसून येते.

रस्त्यावर सांडलेल्या वाळूमुळे विशेषतः दुचाकी घसरण्याचा धोका वाढत असून, त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मार्गाची तातडीने पाहणी करून आवश्यक ठिकाणी �स्पीड ब्रेकर बसवावेत, �रस्त्यावर सांडलेली वाळू हटवावी तसेच �वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर योग्य ती नियंत्रणात्मक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.




