Breaking
ब्रेकिंग

आगामी नगरपालिका, तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा सहकारी बँक, ग्रामपंचायती निवडणुकीत विधानसभा निवडणुकीप्रमाणे आम्हीच गुलाल घेणार — आमदार आशुतोष काळे

0 0 7 1 4 6

आगामी नगरपालिका, तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा सहकारी बँक, ग्रामपंचायती निवडणुकीत विधानसभा निवडणुकीप्रमाणे आम्हीच गुलाल घेणार — आमदार आशुतोष काळे


कोपरगाव — विरोधकांनी सलग 40 वर्षे केलेल्या विकासापेक्षा आम्ही अवघ्या 7 वर्षातील केलेल्या यशस्वी विकासाने विरोधकांचे राजकीय खच्चीकरण झाले असून विधानसभा निवडणुकीप्रमाणे विरोधक हतबल झाले असून स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत आमचे विरोधात सार्वजनिक विकास कामांवर बोलण्यासाठी काहीच शिल्लक नसल्याने आमच्यावर करीत असलेल्या बेताल आरोपांना आगामी नगरपालिका, तालुका पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक, काही ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत मतदार विक्रमी मताधिक्यातून योग्य उत्तर देतील असे आत्मविश्वास पूर्वक प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 71व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना केले .


गौतम सहकारी उद्योग समूहाचे अध्यक्ष व माजी आमदार अशोक काळे यांच्या शुभहस्ते आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात बोलतांना आम. काळे पुढे म्हणाले,
कोपरगाव व राहाता तालुक्यासह, नासिक , अहिल्या नगर जिल्हा, मराठवाड्यातील जनतेला अतिरिक्त पाणी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून वाया जाणारे पाणी मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने नासिकला नवीन जलसंपदा विभाग कार्यालयाचत कामकाज सुरू केले आहे . आमच्या पाठपुराव्यामुळे लवकरच कोपरगांव तालुक्याला किमान अडीच टीएमसी जादा पाणी मिळणार असल्यानेवेळी पाणी वाटपात एक जादा पाणी आवर्तनाचा लाभ मिळणार आहे. गोदावरी उजव्या – डाव्या कालवा कामांना वेग आला आहे. ज्याठिकाणी कायम कालवा आणि चाऱ्या फुटतात तेथे सिमेंट कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे. तसेच नासिक अहिल्या नगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडावे लागणार नाही. किमान दोन वर्षें पाणी टंचाई जाणवणार नाही.


ऊस उत्पादकांनीअशा परिस्थितीत अतिरिक्त पाणी , ऐ. आय. अत्याधुनिक प्रणाली व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 100 ऊस उत्पादन योजनेचा लाभ घेऊन एकरी उत्पादनात प्रचंड वाढ करुन जास्तीत जास्त भाव मिळविण्यात यशस्वी व्हावे असे कळकळीचे आवाहन कारखाना अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी करतांना या वर्षी गेली सहा महिन्यांपासून महाराष्ट्र अती वृष्टीचा बळी ठरला असतांनाच आगामी दोन महिने ही परिस्थिती कायम रहाणार असल्याची भाकिते करण्यात हवामान तज्ञात चुरस निर्माण झाली आहे.

सध्या खरीप वाया गेला असून रब्बी हंगामातील मशागत, लागवड करण्यात विलंब होणार असल्याने सर्वच पिक उत्पादनात अनिश्चितता निर्माण झाली आहे, अनेक ठिकाणी ऊस लोळला आहे. उशीरापर्यंत ऊस गळीताने अनेक पटींनी समस्या निर्माण झाल्या आहेत अशा साखर उपपदार्थ निर्मितीवर अनिष्ट परिणामाचा धोका निर्माण झाला आहे. अशाही अनिश्चित व दयनीय परिस्थितीत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यावर मात करून जिल्ह्यात ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देण्यात यशस्वी होईल अशी ठाम ग्वाही अध्यक्ष आशुतोष काळे यांनी दिली.
कार्यक्रम सूत्र संचालन माजी संचालक अरुण चंद्रे आणि आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रविण शिंदे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 1 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे